Friday, June 2, 2023
Homenewsकांद्याचा आजचा दर किती?...

कांद्याचा आजचा दर किती?…

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली.

प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला. तसेच दोन कांद्यास दहा किलोस 150 ते 180 बाजारभाव मिळाला.तर गोल्टा काद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसुन येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थीर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.


कांद्याला 20 रुपयांचा दर
पुणे जिल्ह्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. कांदा बाजारसमितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची प्रतवारी करण्यात आली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोला 200 रूपये बाजारभाव मिळाला. म्हणजेच शेतकऱ्यांना एका किलोला 20 रुपयांचा दर मिळाला.


कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता
एक नंबरच्या कांद्याला 20 रुपयेचा दर मिळाला तर दोन नंबरच्या कांद्यास दहा किलोस 150 ते 180 बाजारभाव मिळाला. तर, गोल्टा कांद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसून येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थिर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.


शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा
जुन्नर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला 20 रुपयांचा दर मिळाला असला तर शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढले पाहिजेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group