ताजी बातमी ऑनलाइन टीम. *”आज जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने हातकणंगले फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशन च्या वतीने फोटोग्राफी दिवस यशोजीत लॅब पेठवडगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला..*
*”यावेळी मा. अध्यक्ष श्री सुनील माने यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले…अध्यक्ष महेश कुंभार उपाध्यक्ष श्री बजरंग पाटील, श्री विजय कोळेकर, श्री महादेव कुंभार श्री संतोष शिंदे श्री अनिल बामणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले….*
*”यावेळी असोसिएशन च्या वतीने सभासदांना ओळखपत्र, सभासद नोंदणी प्रमाणपत्र व दरपत्रकचे वाटप करण्यात आले…*
*”फोटोग्राफी व्यवसायात सभासदांच्या प्रत्येक संकटात असोसिएशन भक्कम उभी राहील असे प्रतिपादन अध्यक्ष श्री महेश कुंभार यांनी केले… तसेच संघटना कार्यात सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून निस्वार्थी काम करून संघटना बळकट करण्याचे आवाहन मा. अध्यक्ष श्री सुनील माने यांनी केले*
*याप्रसंगी संचालक श्री फिरोझ मुजावर, श्री केशव शिंदे, श्री आकाश झिरंगे व सर्व फोटोग्राफर सभासद बंधू उपस्थित होते… संचालक श्री असिफ पकाले यांनी आभार मानले*