मालिका संपली अन् देवमाणूस झाला भावूक


गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवमाणूस या मालिकेनं जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी मालिकेची चर्चा काय थांबायचं नाव घेत नाही. छोट्या पडद्यावर ‘देवमाणूस’ ही मालिका लोकप्रिय ठरली. मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.


देवमाणूस या मालिकेत डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने साकारली असून या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. किरण गायकवाड याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. या सर्व प्रवासाबद्दल त्यानं त्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
या मालिकेचा निरोप घेताना मालिका संपल्यावर देवीसिंग म्हणजेत अभिनेता किरण गायकवाड ने याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत त्याने प्रेक्षकांसह आपल्या टीमचे आभार मानत एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या शेअरमध्ये किरण गायकवाडने असे लिहले आहे की,


“मी खूप दिवस झाले हा विचार करतोय की, पोस्ट लिहावी पण शब्द मिळत नव्हते. आज लिहूनच टाकलं की देवमाणूस सीरियल बघता बघता संपली. खरतर कुठलाही प्रोजेक्ट तेव्हाच चांगला होतो जेव्हा सगळे जीव तोडून काम करत असतात माझे सहकलाकार, सर्व तंत्रज्ञ, प्रॉडक्शन टीम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंट ते स्पॉट दादांपर्यंत साऱ्यांनी हातभार लावला.


देवमाणुसच्या सेटवरचा प्रत्येक माणूस जीव तोडून काम करत होता त्याबदल वादच नाही. कारण, रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणाऱ्या आजवरच्या मालिकांचे टीआरपी रेकॉर्डस देवमाणसूने मोडले. टीआरपीचे रेकॉर्डस नक्कीच आनंद देतात पण त्यापेक्षाही घराघरातले छोटे आणि मोठे रात्री जागनू न चुकता देवमाणूस बघू लागले. “या डॉक्टरला लई हानला पाहेन”, “ह्यों कसला डॉक्टर शैतान हाय ह्यो” ,”हा डॉक्टर ह्यच्यात …..(अपशब्द)”, “खुप सारे मीम्स तयार झाले या मीम्सला पण सलाम यार “आणि मी म्हणतो हीच खरी माझ्या कामाची पावती.” अशी पाेस्ट करत किरणने टीमसह प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.


किरण गायकवाडने या पोस्टमध्ये पुढे म्हणाला, “हा प्रवास खरंच सोपा नव्हता. इतक्या गंभीर विषयाला अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडताना मनात साशंकता नक्कीच होती. पण जशी कागदावर गोष्ट आणण पात्र आकार घेऊ लागली तशा या शंका मनातून दूर झाल्या.

Leave a Reply

Join our WhatsApp group