पुणे विमानतळ लवकरच 24 तास

धावपट्टी दुरुस्तीच्या कामासाठी सध्या पुणे विमानतळावरून फक्त 12 तासच विमानांची वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक आता 1 डिसेंबरपासून 24 तास सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रात्रीही पुण्यातून बाहेर आणि बाहेरून पुण्यात ये-जा करता येणार आहे.

सध्या 12 तासांत पुणे विमानतळावरून 60 ते 62 विमानांची उड्डाणे होतात. त्याद्वारे 17 ते 18 हजार प्रवासी ये-जा करतात. आता 1 डिसेंबरपासून यामध्ये वाढ होणार असून, 24 तासांत 80 ते 90 च्या घरात पुणे विमानतळावरून विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच पुण्यातून विमानांची वाहतूक सुरू राहणार आहे.

Open chat
Join our WhatsApp group