Friday, March 29, 2024
Homeइचलकरंजीप्रति यंत्रमागाला ५०० रूपये वीज अनुदान द्यावे : सुरेश हाळवणकर

प्रति यंत्रमागाला ५०० रूपये वीज अनुदान द्यावे : सुरेश हाळवणकर

राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना वस्त्रोद्योग वाढीसाठी गोपिनाथ मुंडे यांनी प्रतियंत्रमाग सव्वाशे रूपये वीज बिलाची सवलत दिली होती. त्याचधर्तीवर सध्या सुरू असलेल्या साध्या प्रति यंत्रमागांना वीज बिलात ५०० रूपये अनुदान द्यावे त्याचबरोबर अनुदान व सोयीसुविधा देण्यामध्ये जो प्रादेषिक असमतोल झाला आहे तो दूर करावा, अशी मागणी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती माजी आम. तथा भाजपाचे प्रदेशउपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

वस्त्रोद्योगाचे पुढील पाच वर्षासाठीचे धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांची त्रिसदसीय समिती नेमली आहे. त्यांनी येत्या आठ दिवसात अहवाल सादर करावा, अशा सुचना दिल्या आहेत. या संदर्भात माजी आम. हाळवणकर यांना विचारले असता राज्यसरकारने नुकताच नविन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. हे नवे धोरण व्यापक स्वरूपाचे आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग, गारमेंट, निटींग, सूत गिरणी, जिनींग आदि सर्व घटकांचा विचार करून धोरण तयार केले आहे.

मात्र, यंत्रमागधारक वीज बिलात सवलत, सुताचे दर स्थिर, ५ टक्के व्याजात अनुदान आदि मागण्यांसाठी आग्रही आहेत. धोरण जाहीर झाले असले तरी बदल सुचविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने आपला प्रस्ताव वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे सादर करणार आहे. त्यानंतर धोरणामध्ये बदल करून तो विषय कॅबिनेट बैठकीमध्ये ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री व उपमुख्यांत्र्याच्याबरोबर वस्त्रोद्योग धोरणाबाबत चर्चा केली जाणार आहे. राज्याबरोबरच केंद्रातील नविन वस्त्रोद्योग धोरण करण्याचे काम केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल करीत असल्याचेही हाळवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -