26/11 Mumbai Attack : १३ वर्षे पूर्ण; दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम

ताजी बातमी ऑनलाइन टीम

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या 13 वर्षांनंतरही शहरावरील दहशतवादाचे सावट कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

समुद्रमार्गे आलेल्या 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मायानगरी मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये 34 विदेशी नागरिकांसह एकूण 166 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. सुमारे 700 जण जखमी झाले होते. पोलीस व जवानांनी हा हल्ला परतवून लावत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालून अजमल कसाब या आतिरेक्याला जिवंत पकडले. पुढे त्याला फासवर चढवण्यात तपास यंत्रणांना यश आले. या हल्ल्यात 18 पोलीस जवानांना वीरमरण आले.

मुंबईवर करण्यात आलेल्या या दहशतवादी हल्ल्याला शुक्रवारी 13 वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई पोलीस जिमखान्यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, कामा हॉस्पीटल, नरिमन हाऊस, हॉटेल ताज, हुतात्मा स्मारक, गेट वे ऑफ इंडीया या ठिकाणांसह शहरातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालये, तसेच सामाजिक संस्थांकडून हल्ल्यातील शहीद जवानांना मानवंदना देण्यात येणार आहे.

Open chat
Join our WhatsApp group