शुभमन गिलने कर्णधार म्हणून त्याची केलेली निवड सार्थ ठरवली आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले.
इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला. १९९० मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने १७७ धावा केल्या होत्या आणि ती आतापर्यंतची भारतीय कर्णधाराची इंग्लंडमधील सर्वोत्तम खेळी होती. या खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडले आणि ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांनीही उभं राहून त्याचं कौतुक केलं
यशस्वी जैस्वालने सलामीला येऊन ८७ धावांची खेळी केली. लोकेश राहुल ( २), करुण नायर ( ३१) आणि रिषभ पंत ( २५) यांना मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी व शुभमन गिल यांनी चौथ्या विकेटसाठी मजबूत भागीदारी करताना संघाला अडीचशे पार पोहोचवले. जडेजा १३७ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८९ धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलचा दबदबा राहिला. कसोटीत कर्णधार म्हणून द्विशतक झळकावणारा तो मन्सुर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांच्यानंतर सहावा भारतीय कर्णधार ठरला.
वन डे व कसोटी क्रिकेटमध्ये वयाच्या पंचवीशीत द्विशतक झळकावणआरा तो पहिला खेळाडू आहे. वन डे व कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, रोहित शर्मा यांचाही समावेश आहे.
SENA देशांमध्ये द्विशतक करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वोत्तम खेळीचा भारतीय कर्णधाराचा विक्रमही आता गिलने नावावर केला आहे.
इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात पाहुण्या कर्णधाराचा सर्वोच्च धावसंख्या
३११ – बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया), मँचेस्टर, १९६४
२७७ – ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका), बर्मिंगहॅम, २००३
२५९ – ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका), लॉर्ड्स, २००३
२२९* – शुभमन गिल (भारत), बर्मिंगहॅम, २०२५
२११ – बिली मर्डोक (ऑस्ट्रेलिया), द ओव्हल, १८८४
२०८ – डडली नॉर्स (दक्षिण आफ्रिका), नॉटिंगहॅम, १९५१
२००* – अॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया), लीड्स, १९९३
कसोटीत द्विशतक करणारा सर्वात तरुण कर्णधार
२२ वर्षे १७३ दिवस – ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २००३
२३ वर्षे ३४ दिवस – मन्सूर अली खान पतौडी (भारत) विरुद्ध इंग्लंड, दिल्ली, १९६४
५ वर्षे २९७ दिवस – शुभमन गिल (भारत) विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२५*
२५ वर्षे ३०४ दिवस – मुशफिकुर रहीम (बांगलादेश) विरुद्ध श्रीलंका, गॉल, २०१३
२६ वर्षे १८८ दिवस – सचिन तेंडुलकर (भारत) विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, १९९९
इंग्लंडमध्ये भारताचा कसोटीत सर्वाधिक धावा
२२९* – शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२५
२२१ – सुनील गावस्कर, द ओव्हल, १९७९
२१७ – राहुल द्रविड, द ओव्हल, २००२
१९३ – सचिन तेंडुलकर, लीड्स, २००२
१८७ – रवी शास्त्री, द ओव्हल, १९९०





