दोन डोकं असलेल्या बाळाचा जन्म, रुग्णालयातून जन्मदात्यांचा पळ, डॉक्टरांचा मोठा निर्णय

ताजी बातमी ऑनलाइन टीम

झारखंडच्या रिम्स (RIMS) रुग्णालयामध्ये दोन डोकं असलेल्या बाळाचा जन्म झाल्याची अनोखी घटना समोर आली आहे. मात्र निर्दयी जन्मदात्री आपल्या तान्ह्या बाळाला जन्म देऊन पळून गेली. बाळाला जन्मतःच ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल या आजाराने ग्रासले आहे. या आजारात डोक्याचा मागचा भाग बाहेर येऊन थैलीसारखा होऊन दोन डोक्यांसारखा दिसतो. हा भाग मेंदू आणि त्वचेलाही जोडलेला असतो.

बाळाच्या आई-बाबांचा रुग्णालयातून पळ

बाळाची अशी अवस्था पाहून सख्ख्या आई-बापाने त्याला रुग्णालयात सोडून गुपचूप पळ काढला. या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला. तपासात त्यांचा पत्ताही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांतर्फे चालवलेली जाणारी एनजीओ सध्या अर्भकाची काळजी घेत आहे

Open chat
Join our WhatsApp group