Friday, February 23, 2024
Homeइचलकरंजीधावपट्टूचा रन वारी उपक्रम

धावपट्टूचा रन वारी उपक्रम

आषाढी वारीच्या निमित्ताने विविध ठिकाणांहून अनेक पायी दिंडी जात आहेत. पण इचलकरंजीतील सचिन बुरसे या धावपट्टूने सलग १४ तास धावत तब्बल १०० किलोमिटरची पहिली ‘रन’वारी पूर्ण करीत वेगळ्या पध्दतीने विठ्ठलाच्या चरणी आपली भक्तीभाव अर्पण केला. सचिन हा धावपट्टू आहे.

दोन वर्षापूर्वी नित्य व्यायामाला सुरुवात केल्यानंतर धावण्यामध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर पळण्याचा सराव सुरु केला. मॅरेथॉन स्पर्धांचा प्रवास सुरु असताना दोन महिन्यांपूर्वी `रन`वारी करण्याचा विचार सचिनच्या मनात आला. त्यानंतर त्याने दररोज दोन तास सराव सुरु केला. प्रत्येक रविवारी लाँग रन सुरु केली. ५० किमीची एक लाँग रन पूर्ण केली.

आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर सचिनने `रन`वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिरढोण (जि. सांगली) येथून रात्री आठ वाजता पहिल्या `रन`वारीस प्रारंभ केला. सकाळी १० वाजता पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला प्रदशिक्षणा घालून सचिनने नामदेव पायरीवर नतमस्तक होत `रन`वारी पूर्ण केली. राहूल शिरसाट, जयदीप गुरव, प्रणव पाटील यांचे सहकार्य मिळाले. ही माझी पहिलीच ‘रन’वारी होती. ती करताना शारिरीक त्रास सहन करावा लागला असला तरी मानसिक समाधान मोठे मिळाले. दरवर्षी असा उपक्रम राबवणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -