मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला


मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब हल्ला केला आहे. सध्या मेघालयमध्ये संचारबंदी लागू असून गेल्या दोन दिवसांपासून येथील वातावरण खूप तणावपूर्ण आहे.
मेघालयमध्ये माजी बंडखोर नेता चेरिशस्टारफील्ड थांगखू याच्या मृत्यूवरुन हिंसाचार वाढत आहे.
मेघालयात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.


तत्पुर्वी रविवारी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान काही हिंसक घटना घडल्या. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री लखन रिंबुई यांनी सायंकाळी राजीनामा दिला. तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला झाला आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
हिंसक घटनांनंतर शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजधानी आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आदेशात असे म्हटले आहे की १७ ऑगस्ट पर्यंत संचारबंदी कायम राहणार असून परिस्थिती पाहून इंटरनेट सेवा सुरु करण्यात येईल.
शिलाँगच्या जाआव परिसरातील मावकीनरोह परिसरात पोलिस वाहनाला आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी आग लावली.


यावेळी मानकीनरोह पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी थोडक्यात वाचले.
माजी विद्रोही नेता चेरिशस्टारफिल्ड थांगखुय याच्या घरी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. त्यात त्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.
थांगखूच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूला ‘पोलिसांनी केलेली क्रूर हत्या’ म्हटले त्यानंतर राज्यात हिंसाचार उसळला होता. पेट्रोल बॉम्ब हल्ला झाल्याने वातावरण आणखी तापले आहे.


त्याच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक काळे झेंडे घेऊन सहभागी झाले. शनिवारी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या प्रकरणाची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group