इचलकरंजीत दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने पादचारी वृद्ध महिला जागीच ठार झाली. आक्काताई आनंदा चव्हाण (वय ७४, रा. कबनुर) असे तिचे नाव आहे. कबनूर येथील आजरा बॅकेजवळ हा अपघात घडला. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

कबनूर मधील रहिवासी असलेल्या आक्काताई चव्हाण या आज सकाळी आजरा बँकसमोरून चालत जात होत्या. तेव्हा पाठीमागून आलेल्या देवराज कांबळे याच्या दुचाकीने चव्हाण यांना जोराची धडक दिली. या अपघातात चव्हाण या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ आयजीएम सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी राजु चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार देवराज कांबळे याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Join our WhatsApp group