Friday, April 26, 2024
Homeक्रीडाइंग्लंडच्या टीममध्येही कोरोनाचा शिरकाव, कसोटीचं काय होणार..?

इंग्लंडच्या टीममध्येही कोरोनाचा शिरकाव, कसोटीचं काय होणार..?

गेल्या वर्षी भारत व इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय संघ मालिकेत 2-1 असा आघाडीवर होता.. स्थगित करण्यात आलेला पाचवा सामना येत्या 1 जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे..

भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच भारताचा स्टार ऑफस्पीनर आर. अश्विनला कोरोनाची लागण झाली.. त्यामुळे तो टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये आला नव्हता.. त्यानंतर इंग्लंडमध्ये आल्यानंतर माजी कॅप्टन विराट कोहलीला कोरोनाने घेरले.. तो त्यातून सावरत नाही, तोच कॅप्टन रोहित शर्मा याचा कोविड रिपोर्ट ‘पाॅझिटिव्ह’ आला..

सध्या रोहित शर्माला विलगीकरणात ठेवले आहे. मॅचपूर्वी त्याचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ न आल्यास भारतीय संघाचा कॅप्टन कोणाला करायचे, असा पेच ‘बीसीसीआय’समोर निर्माण झाला आहे.. भारतीय संघ कोरोनाच्या तडाख्यात सापडलेला असताना, आता इंग्लंड टीममध्येही कोरोनाने शिरकाव केल्याचे वृत्त समोर येत आहे..

इंग्लडच्या खेळाडूला कोरोना
इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंड विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळत असतानाच, त्यांचा विकेटकिपर ‘बेन फोक्स’ याला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. बेन फोक्सचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या जागी ‘रिप्लेसमेंट’ म्हणून सॅम बिलिंग्जचा समावेश करण्यात आल्याचे म्हटले आहे.

न्यूझीलंड विरूद्ध कसोटी सामना सुरु असतानाच, फोक्सची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विकेटकिपिंग करता आली नाही. फोक्स संघात कधी परतणार, याची माहिती योग्य वेळी दिली जाईल. भारताविरुद्धच्या कसोटीपूर्वी तो तंदुरूस्त होईल, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले.

‘बेन फोक्स याच्याशिवाय इंग्लंडच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण झालेली नाही. इतर खेळाडू कोरोना प्रोटोकॉलचं पालन करत आहेत, मात्र गरज पडल्यास इतर खेळाडूंचीही कोरोना टेस्ट केली जाईल,’ असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.. भारतीय संघानंतर इंग्लंड संघातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकमेव कसोटी सामना अडचणीत आलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -