कोल्हापूर-सांगली पूर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या पूर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले
जातील, तसेच मंत्रालय स्तरांवर विशेष बैठक घेतली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. १३) कोल्हापुरात केले.


मुख्यमंत्री शिंदे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीसह प्रलंबित प्रश्नांचाही आढावा घेतला. अतिवृष्टीनंतर वारंवार येणाऱ्या पूर परिस्थितीची तसेच शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचाही त्यांनी आढावा घेतला. पिकांच्या नुकसानीची ‘एनडीआरएफ’च्या निकषांच्या दुप्पट भरपाई देण्यात येईल, याचा पुन्नरुचारही त्यांनी केला.

Join our WhatsApp group