वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या जागी शिखर धवनला कर्णधार बनवण्यात आले आहे. उभय संघांमधील मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंचा या मालिकेत समावेश करण्यात आलेला नाही. या मालिकेत अनेक युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत.या खेळाडूंना मिळाली संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची धुरा शिखर धवनच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या मालिकेसाठी शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले आहे तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरही टीम इंडियाचा एक भाग आहे. ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांचं वनडे संघात पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेळाडू काही काळ टीम इंडियाचा भाग बनू शकले नाहीत. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही या संघात स्थान मिळाले आहे.

Join our WhatsApp group