भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. या वियासोबतच टीम इंडियाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला मायदेशात टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. तसेच तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 3 गड्यांच्या बदल्यात 237 धावां केला. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पहिले षटक मेडन टाकल्यानंतर दुसऱ्या षटकात अर्षदिपने दोन विकेट घेततल्या. मात्र त्यानंतर अॅडम माक्ररम, क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 221 मजल मारली. मिलरने आपले वेगवान शतक पूर्ण केले मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.रोहितने रचला इतिहास
या मालिकेत विजयासोबत कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत भारतात एकही टी-20 मालिका हारला नव्हता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाने या मालिकेत 2-0 ने घाडी घेतली आहे. यासोबत ही तीन सामन्यांची मालिका देखील आपल्या नावावर केली आहे. भारतीय भूमीवर T20I मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

Join our WhatsApp group