भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज एकदिवसीय सामना, कुठं व कधी पाहाल..?

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) क्रिकेट संघामध्ये आज एकदिवसीय मालिकेस सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार शिखर धवन व श्रेयस अय्यर उपकर्णधार म्हणून भूमिका बजावणार आहे. ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारताचे प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याने अनेक युवा खेळाडूंना एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली आहे.

आयपीएल गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी: राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, मुकेश कुमार, शुभमन गिल

भारताचा संभाव्य संघ: शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

▪️ आजच्या सामन्याची वेळ : दु. 1.30 वा.
▪️ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिज्नी+ हॉटस्टार.

एकदिवसीय मालिकेच्या तारखा:

▪️ पहिला एकदिवसीय सामना: 6 ऑक्टोबर 2022
▪️ दुसरा एकदिवसीय सामना: 9 ऑक्टोबर 2022
▪️ तिसरा एकदिवसीय सामना: 11 ऑक्टोबर 2022

Join our WhatsApp group