Thursday, March 28, 2024
HomeसांगलीSangli : तळे फुटून साडेतीन एकरातील ऊस मातीखाली

Sangli : तळे फुटून साडेतीन एकरातील ऊस मातीखाली

बोरगाव ता.तासगाव येथे गेल्या दोन तीन दिवसापासूनसतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रेवणगंगा नदीच्या शेजारी असणारे महादेवाचे तळे फुटून जवळपास सडेतीन एकर ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. व शेतात पाण्याच्या प्रवाहाने काही ठिकाणी माती वाहून जाऊन वगळी पडल्या आहेत.

तासगाव तालुक्यातील बोरगाव, निंबळक, आळते, लिंब, शिरगावसह येरळा नदीच्या काठावर पडलेल्या धुवाधार पावसाने नदीसह सर्वच ओढे, नाले, छोटे तलाव ओसंडून वाहु लागले आहेत. याचं वेळी बोरगाव येथे असणाऱ्या महादेवाचे तळे पावसाच्या पाण्याने भरून फुटले आहे.

यामध्ये बोरगाव येथील शेतकरी बाळकृष्णं गुरव यांचा दीड एकर 86032 जातींच्या आडसली चालु हंगामात जाणारा ऊस वाहुन जावून त्यांचे अंदाजे 150 टनाचे नुकसान झालेले आहे. युवराज पाटील यांचा एक एकर आडसली चालु हंगामात जाणारा ऊस अन्दजे 60 टनाचे नुकसान आणि रावसाहेब पाटील यांच्या एक एकर चालू आडसाळी लागणीचे गाळ,माती व दगड बसुन मुजुन वाहून गेला आहे.

महादेव तळ्याच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडण्यासाठी घातलेले पाईप चुकीच्या पद्धतीने घातले गेल्याने पाणी साठा वाढून तळे फुटून ‘शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याची तक्रार शेतकारी गुरव यांनी सांगितली आहे. नुकसानीचा पंचनामा गावकामगार तलाठी सीमा ओतारी यांनी केला आहे.

चालू हंगामातील जाणारा ऊस असल्याने शेतकऱ्याच्या तोंडशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने मिळणाऱ्या मदतीची अपेक्षा नुकसानीच्या प्रमाणात मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तळे फुटून झालेल्या नुकसानीने व शेताची व पिकाची झालेली दयनीय अवस्था पाहून परिसरातील हजारो शेतकरी बांधवांच्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -