Friday, March 29, 2024
Homeराजकीय घडामोडीसंजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच; पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला

संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच; पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला

पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपाखाली तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच जाणार हे आता स्पष्ट झालं आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत 2 नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही. राऊतांच्या कोठडीत आपोआपच 13 दिवसांची वाढ झाली आहे. 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत.

दरम्यान, गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत हेच मुख्य सूत्रधार असल्याही आरोप ईडीने केला होता. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती असं ईडीने म्हंटल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -