पश्चिम आशियातील तणावामुळे एलपीजी पुरवठ्यात काही समस्या निर्माण झाल्यापासून गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडर चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. या दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून LPG गॅस सिलिंडर कनेक्शनसाठी ई-केवायसी प्रक्रियाही जोर धरत असून याआधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 16 ऑगस्ट अंतिम मुदत होती, ज्याला अलीकडच्या तांत्रिक समस्येमुळे मुदतवाढ जाहीर केली आहे.
एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी करण्यात अडचणी
घरगुती एलपीजी वापरकर्त्यांना सरकारने 16 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत दिलेली, जी एका आठवड्याने पुढे ढकलली आहे. 16 ऑगस्टऐवजी आता घरगुती गॅस सिलिंडरचे ग्राहक 23 ऑगस्टपर्यंत एलपीजी ई-केवायसी करण्याची मुदतवाढ दिली गेली आहे. मात्र, ई-केवायसी सर्व्हरमध्ये समस्या येत असल्याचेही अनेक अहवालातून समोर येत आहेत, ज्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत आणि यामुळेच अंतिम मुदत वाढवली गेली आहे.
सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवली असली तरीही अनिवार्य आधार प्रमाणीकरण पूर्ण करू पाहणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी या अतिरिक्त वेळेमुळे त्रास कमी झालेला नाही, असे द टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटले आहे.
याआधी 16 ऑगस्ट एलपीजी ई-केवायसीची अंतिम मुदत निश्चित केली गेलेली आणि तेल मंत्रालय व सर्व एलपीजी गॅस पुरवठादार कंपन्यांनी अनिवार्य असल्याने म्हणून वारंवार सूचनाही जारी केलेल्या. पण, याआधी पूर्वी निश्चित केलेल्या 16 ऑगस्टच्या अंतिम मुदतीमुळे दबाव निर्माण झालेला जो कमी करण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ दिली गेली पण, नवीन विंडोमध्येही तांत्रिक समस्या कायम असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे.
एलपीजी ई-केवायसीसाठी आवश्यक आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लाखो एलपीजी ग्राहकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तासन्तास सर्व्हर बंद, सदोष ॲप्स आणि डिजिटल पायाभूत सुविधांवरील प्रचंड ताणामुळे जी प्रक्रिया सोपी असायला हवी त्यामुळे दररोज ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
एलपीजी ई-केवायसी कशी करायची?
तुमच्या गॅस एजन्सीला भेट देऊन तुम्ही गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी पूर्ण करू शकता.
प्रक्रिया घरबसल्याही तुम्ही ही पूर्ण करू शकता.
तुम्हाला ज्या कंपनीचे गॅस सिलिंडर हवं आहे, त्या कंपनीच्या ॲपला भेट देऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता
ई-केवायसी कोणी करायचे?
लक्षात घ्या की सर्वच एलपीजी गॅस ग्राहकांना ई-केवायसी करायची गरज नाही.
ज्यांनी आधीच ई-केवायसी पूर्ण केले आहे, त्यांना पुन्हा करायची आवश्यकता नाही.
तुम्ही तुमच्या ई-केवायसीचे स्टेटस ॲपवर किंवा तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधून तपासू शकता.
सरकारने एलपीजी ई-केवायसीसाठी अंतिम मुदत वाढवली आहे, तुम्हाला वाटते का ही मुदत आणखी वाढवली पाहिजे? तुमचा अनुभव आणि मत कमेंटमध्ये नक्की सांगा
