ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत टोकाची ईर्ष्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. शुक्रवारी निवडणुकीचा निकाल लागताच लोकल अदानी आणि अंबानी यांनी केलेल्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील टोकाला पोहोचलेली ईर्ष्या पाहता आज काही गटांत धक्कादायक निकाल लागले. निवडणुकीत प्रकाश आवाडेंसह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.या निकालानंतर ‘तो पत्ता करतो गुल, आमचा नेता हाय लय पावरफुल्ल…’ असे स्टेटस शेअर करत कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर जल्लोष पाहायला मिळाला. तसेच विजयी नेत्यांचे फोटो, व्हिडीओ, मीम्स अनेकांच्या सोशल मीडियावर झळकत होते.
कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचे, गटाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची स्पर्धाच रंगली होती. आपल्या नेत्याला, आघाडीला गुलाल लागताच पैजा जिंकल्याचा जल्लोष कार्यकर्त्यांकडून व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर केला जात होता.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील पाटील-यड्रावकर यांच्या कारच्या नंबरची सुरुवात 98 पासून होते आणि त्यांचा विजयही 98 मतांनी झाला आहे. या योगायोगाची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु होती.
कोल्हापूर ‘लोकल’ अदानी-अंबानी यांनी केला ’करेक्ट’ कार्यक्रम
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -