Sunday, December 22, 2024
HomeनोकरीTET exam : बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार

TET exam : बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार

आरोग्य विभाग, म्हाडा परीक्षेतील गोंधळानंतर बहुचर्चित राज्य पात्रता परीक्षेतील (टीईटी) भ्रष्टाचाराची शासनाने गंभीर दखल घेत 2013 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात बोगस प्रमाणपत्र आढळल्यास ‘त्या’ शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर अटळ आहे. त्याचबरोबर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

शिक्षक व शाळा मान्यता, वाढीव तुकड्यांना मान्यता यासह शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती, वैद्यकीय बिलाबाबत यापूर्वी शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांनी टीईटी परीक्षेत भ्रष्टाचार केला. अपात्र उमेदवारांना उत्तीर्ण करून कोट्यवधी रुपये घेण्याचे प्रकार घडले.

त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांना आदेश दिले. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडून हे प्रमाणपत्र शिक्षण विभागास सादर करण्याची मुदत संपली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे 114 व खासगी प्राथमिक शाळांतील 18 शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर केली आहेत. त्यापैकी प्राप्त 111 टीईटी प्रमाणपत्र पुणे कार्यालयास पाठविली आहेत. काही महिला शिक्षिका प्रसूती रजेवर असल्याने त्यांनी प्रमाणपत्र सादर केली नाहीत. त्यामुळे अडचणी येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -