आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच HRA मध्येही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढल्यावर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी वाढेल आणि त्याचा परिणाम HRA वरही होऊ शकतो. विशेष म्हणजे X कॅटेगरीतल्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा जास्त फायदा मिळण्याची शक्यता आहे.
लेव्हल ७ च्या कर्मचाऱ्यांचे गणित
लेव्हल ७ च्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा बेसिक पगार ४४,९०० गृहीत धरला आहे. जर ३ पट फिटमेंट फॅक्टर लागू झाला आणि बेसिक पे १,३४,७०० झाला, तर X शहरात ३० टकके HRA म्हणजे ४०,४१०, Y शहरात २६,९४० आणि Z शहरात १३,४७० रुपये मिळू शकतात.
२.५ पट फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्याने बेसिक पे १,४०,२५० रुपये मानला आहे. त्यानुसार HRA अनुक्रमे ₹३३,६७५, ₹२२,४५० आणि ११,२२५ होऊ शकतो. तर २ पट फिटमेंट फॅक्टर असल्यास बेसिक पे ₹८९,८०० गृहीत धरल्यावर X, Y आणि Z शहरांसाठी HRA अनुक्रमे
तर 2 पट फिटमेंट फॅक्टर असल्यास बेसिक पे ₹89,800 गृहीत धरल्यावर X, Y आणि Z शहरांसाठी HRA अनुक्रमे ₹२६,९४०, ₹१७,९६० आणि ₹८,९८० इतका होऊ शकतो.
अंतिम निर्णय महत्त्वाचा
हे सर्व आकडे अंदाज आणि उदाहरण म्हणून पाहावे लागतील. आठव्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर, नवीन बेसिक पे आणि HRA चे दर सरकारच्या निर्णयानंतर निश्चित होतील. त्यामुळे सध्या ₹४०,४१० HRA मिळेल असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. फिटमेंट फॅक्टर वाढल्याने मात्र बेसिक पे वाढून HRA मध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
