Homeमहाराष्ट्रगायब झालेली 8 महिन्यांची चिमुरडी 3 दिवसांनी सापडली; बेपत्ता होण्याचं गूढ कायम

गायब झालेली 8 महिन्यांची चिमुरडी 3 दिवसांनी सापडली; बेपत्ता होण्याचं गूढ कायम

तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधून बेपत्ता झालेल्या 8 महिन्यांच्या चिमुरडीचा शोध लागला आहे. ही चिमुरडी येवल्याच्या वाईबोधीजवळ आढळली. ही चिमुरडी गायब झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती आणि यात एका संशयिताने आत्महत्या केल्यामुळे हे प्रकरण खूप गंभीर झाले होते.

 

मात्र, तिसऱ्या दिवशी ही चिमुरडी बेवारस अवस्थेत आढळल्याने तिला तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेत तिच्या आईवडिलांना शोधले आणि ते आल्यानंतर चिमुरडीचा ताबा आईवडिलांकडे दिला. मात्र, या चिमुरडीला कुणी गायब केले, येवल्याच्या वाईबोधीजवळ कुणी सोडले, याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तिच्या गायब होण्याचे आणि पुन्हा सापडण्याचे गूढ निर्माण झाले आहे.

 

नांदगाव तालुक्यातून आठ महिन्यांची चिमुरडी तीन दिवसांपूर्वी (17 सप्टेंबर) मध्यरात्री घरातून बेपत्ता झाली होती. नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथे या गावातील ही घटना होती. मध्यरात्री सुमारे १२ वाजता चिमुरडी तिच्या आई-वडिलांच्या अंथरुणातून गायब झाली होते. सर्वजण झोपलेले असताना चिमुरडी अचानक अंथरूणातून गायब झाल्याने कुटुंबाला जबर धक्का बसला होता. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चारही बाजूंना शोधाशोध करणयात आली. त्यानंतरही तिचा शोध न लागल्याने अखेरीस चिमुरडीच्या वडिलांनी नांदगाव पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.

 

या तक्रारीची तातडीने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा कामाला लागली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. पोलीस तसेच स्थानिकांनी परिसर पिंजून काढला. तसेच शेत आणि जंगलातही शोध घेतला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. आई-वडिलांचा याबाबत एका व्यक्तीवर संशय होता. पण त्या व्यक्तीनेही आयुष्य संपवल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे चिमुरडीच्या गायब होण्याचे गूढ वाढले होते. अशातच तीन दिवसांनंतर ती येवल्याच्या वाईबोधीजवळ बेवारस स्थितीत आढळली. येवला पोलिसांनी तातडीने तिला येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्या उपचार सुरू असतानाच तिच्या आईवडिलांना कळवण्यात आले. त्यांनीही तातडीने येवल्यात येत ओळख पटवून मुलीचा ताबा घेतला.

 

ही 8 महिन्यांची गायब झालेली मुलगी तीन दिवसांनंतर सापडली असली तरी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथून गायब झालेली चिमुरडी येवला तालुक्यातील वाईबोधी गावात कशी आली, हे काम कुणी केले, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात मुलीला आणून बेवारस का सोडले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता दोन्ही ठिकाणचे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -