मराठा आंदोलक मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आंदोलकांच्या चौकशीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे.
मराठा आंदोलनाला कुणीच साथ द्यायची नाही का? जे आंदोलक साथ देत आहेत. त्यांना तुरुंगात टाकणार, तुरुंगात टाकणार असंच करणार तुम्ही, तुमचं सरकारही कधी तरी बदलणारच ना. मग आम्ही सुद्धा खुनशी आहोत. एकनाथ शिंदे यांचे आमदार, खासदार, मंत्री आमच्या कामाला यायला हवे होते. तर ते आमच्या चौकशा लावण्याच्या कामाला येत आहे, ही आनंदाची गोष्ट झाली आहे. हरकत नाही. मराठा आंदोलक गुंतवायचे काम त्यांनी पूर्ण करून घ्यावं. आम्ही काही मागं सरकणार नाही, असा पलटवार जरांगे पाटील यांनी केला.
मी पण जरांगे आहे
मराठा समाजाने हे आमदार, खासदार निवडून आले आहे. त्यानंतर त्यांना हा अधिकार मिळाला आहे. ते मराठा आंदोलकांच्या कामाला येत नाही. निवडून आमच्या मतांवर आले. आता दगाफटका करत आहेत. मराठा आंदोलकांच्या चौकशा लावल्या, एकनाथ शिंदे यांच्या काळात काय मोठा बदल, काय मोठे परिवर्तन सुरू आहे. तुम्ही काही अमृत पिऊन आले नाही. तुमची कधी ना कधी सत्ता जाणार आहे. मी पण मनोज जरांगे आहे, असा इशारा त्यांनी दिला. तर चौकशासंबंधी जे मागणी करत आहे. त्यांना हे कटकारस्थान करण्यासाठी राहिलेला, उर्वरीत इसार देण्यात आल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
