दिलेल्या रकमेच्या व्याजासाठी सतत तगादा लावत पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीने शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बबन तुकाराम आवळे (रा. कोरोची) याच्यावर खाजगी सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वैशाली इसराईल गायकवाड (वय ३० रा. कोरोची) यांनी फिर्याद दिली आहे.
मयत इस्राईल गायकवाड माहिती अशी, मयत इसराईल गायकवाड
यावाचत पोलिसांतून मिळालेली आणि बबन आवळे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यातूनच तीन वर्षापूर्वी गायकवाड यांनी आवळे यांच्याकडून गरजेपोटी २ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याच्या व्याजापोटी गायकवाड यांनी दर आठवड्याला १० हजार रुपये देत होते. तरीही आवळे यांनी गायकवाड यांच्याकडे व्याजाची रक्कम वेळेत देणेबाबत तगादा लावला होता. त्या तगाद्याला कंटाळून गायकवाड यांनी २९ सप्टेंबर रोजी कोरोचीतील माने यांच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येस आवळे हेच जबाबदार असून त्यांनी लावलेल्या तगाद्यामुळे गायकवाड यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
