Homeमहाराष्ट्रजग हादरलं, भारतीय पायलटवर हल्ला करणाऱ्या ओमानचा पायलट थेट 2024 मध्येच..

जग हादरलं, भारतीय पायलटवर हल्ला करणाऱ्या ओमानचा पायलट थेट 2024 मध्येच..

दुबईहून इस्त्रायलकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. जगानेही ज्याचा विचार केला नाही असे फ्लायदुबईच्या विमानात घडले. त्यातच ओमानच्या पायलटबद्दल धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, खाडी देशांनी शांततेची भूमिका घेतली असून त्यांनी माैन बाळगले आहे. रिपोर्टनुसार, भारतीय पालयट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला ओमानच्या पायलटने केला. यासोबतच त्याने विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी भारतीय पायलटने स्वत:च्या जीवाची परवा न करता 180 जणांचा जीव वाचवला. गंभीर जखमी असतानाही त्यांनी आपत्कालीन कोड पाठवले आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवाशांना आवाज दिला. यावेळी विमान खाली जात होते.

 

काही सेकंदही उशीर झाला असता तर विमान कोसळले असते. प्रवाशांनी को पायलटला पकडून ठेवले. गंभीर जखमी असतानाही विमान सुरक्षित स्मित मच्छार यांनी उतरवले. ओमानच्या पायलटला कोणत्याही स्थितीत हे विमान क्रॅश करायचे होते. मात्र, त्याला हे करण्यापासून भारतीय पायलटने रोखले. भारतीय पायलटची स्थिती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या धैर्याने 180 प्रवाशांचे जीव वाचले आहेत.

 

ओमानच्या पायलटची चाैकशी केली जात आहे. ओमानच्या पायलटबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. 2024 मध्ये पायलटचे पितळ उघडे पडले होते. त्यानंतर त्याला प्रशासकीय कामकाजात लावले. कट्टरपंथी आणि जिहादी कारवायांशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली. त्यावेळी त्याच्यावर म्हणावी तशी कारवाई करण्यात आली नाही. इस्त्रायलबद्दल त्याच्या मनात कट्टूता होती.

 

फ्लायदुबईच्या विमानात जास्त करून प्रवासी हे इस्त्रायली होते. त्याच पुन्हा प्रश्न तोच उपस्थित केला जात आहे की, इस्त्रायल आणि ओमान यांच्यात संबंध तणावपूर्ण असताना ओमानच्या पायलटला इस्त्रायलमध्ये जाणाऱ्या विमानाची परवानगी देण्यात कशी आली. या को पायलटच्या मनात मोठा कट होता, जो भारतीय पायलटने उडवून लावला. याबाबत आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. युएईकडून पायलटची चाैकशी केली जात आहे. इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणेची यावर बारीक लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -