Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना : कोरोनाच्या नव्या नियमांमुळे वधू-वर मंडळी

कोरोना : कोरोनाच्या नव्या नियमांमुळे वधू-वर मंडळी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असताना अनेकांचे विवाह सोहळे जुळले, मात्र आता पुन्हा राज्‍य शासनाने कोरोनाचे नवे निर्बंध घातल्‍याने अनेकांची अडचण झाली आहे. विवाह कसे उरकायचे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

कोरोना रूग्‍णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर नागरिकांनी लग्न उत्सवाचा धूमधडका सुरू केला होता. कोरोना आता पुन्हा मोठ्याप्रमाणात येणार नाही. अशी आस ठेवून लोकांनी लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात केली होती. काहीचे लग्न सोहळे देखील थाटामाटात पार पडले. परंतु आता मात्र पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढल्याने आणि लागलेल्या नव्या निर्बंधांमुळे लग्न कार्यात अडचण निर्माण झाली आहे.

लग्नकार्य थाटामाटात करणे जनू पंरपराच झाली आहे. त्यामुळेच आपला हा विवाह सोहळा धुमधडाक्‍यात व्हावा या उद्देशाने वधू वर या दोन्ही पक्षांकडून लाखो रूपायांचे खर्चाचे नियोजन केले जाते. याचे बोलके चित्र नेहमीच आपल्याला दिसत असते. त्यात डीजे, मंगल कार्यालय तर लग्नाला येणाऱ्या जेवणाचा खर्चसुध्दा करण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र आता पुन्हा कोरोना डोके वर काढतो आहे. यामुळे लग्नसोहळ्यांवर विरजण पडत आहे. लग्न जुळलेल्या नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण दिले. लग्न पत्रिका पोहच झाल्या आहेत. लग्न जवळ आले परंतु करोना निर्बंध लागल्याने आता त्यांची पंचाईत झाली आहे.

कोणाला बोलवायचं आणि कोणाला सोडायचे, हा तिढा सुटता सुटेना असा झाला आहे. शासनाने लग्नकार्य जागेच्या क्षमतेत 50 टक्के तर हॉलमध्ये 25% नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे लग्नास नातेवाईक अधिक आल्यावर आपल्यावर करोना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात येईल आणि दंड, गुन्हा नोंदवला जाईल या भीतीनं अनेकांनी लग्नकार्य पुढे ढकल्यणास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -