ताजी बातमी ऑनलाईन टीम
जोपर्यंत ऑक्सिजनची गरज वाढत नाही किंवा रुग्णालयांमध्ये दाखल होणार्या रुग्णांची संख्या वाढत नाही तोपर्यंत सध्या लावलेल्या निर्बंधांपेक्षा आणखी निर्बंध वाढवण्याची गरज वाटत नाही. मात्र रुग्णांमध्ये वाढ होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रविवार मध्यरात्रीपासून पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आता यानंतर राज्यातील निर्बंध वाढणार का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी भाष्य केले आहे.
साधी लक्षणे असली तर घरीच उपचार घ्यावे. यासोबतच मास्कचा वापर करा. एवढेच नाही तर गरम पाणी आणि व्यायामही करा, असेही प्रसार माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले. राज्याच्या हितासाठी निर्बंध पाळणे, गर्दी टाळण्याचे आणि लसीकरण करून घेण्याचे आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या 2 ते 3 दिवसांमध्ये दुप्पट होती. कालपर्यंत 40 ते 45 हजार रुग्णांची वाढ होत असल्याने असे निर्बंध लावणे आवश्यक होते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
रूग्णालयातील रूग्णांची संख्या वाढत नाही तोपर्यंत निर्बंध वाढवण्याची गरज नाही : राजेश टोपे
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -