Friday, June 21, 2024
Homeआरोग्यविषयकOmicronची ही आहेत 5 धोकादायक लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष करू नका!

Omicronची ही आहेत 5 धोकादायक लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष करू नका!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron) भर पडली आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची (Omicron Patient) संख्या देखील झपाट्याने वाढत चालली आहे. एका महिन्यामध्ये ओमिक्रॉनने संपूर्ण जगाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये अशी अनेक लक्षणं दिसत आहेत जे या आधी कधीच दिसले नाहीत. डॉक्टरांच्या मते, ‘ओमिक्रॉनच्या सुरुवातीच्या लक्षणांवर योग्य वेळी लक्ष दिले तर त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.’ आज आम्ही तुम्हाला ओमक्रॉनच्या अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत त्याकडे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष करु नका.

हे ओमिक्रॉनच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये दिसून येते. ओमिक्रॉन संक्रमित लोकांच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे त्यांची नखे निळी पडू लागतात. जर तुम्हाला असे काही दिसत असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा.

तुमच्या त्वचेवर अचानक डाग पडल्यास किंवा त्वचा, ओठ निळे पडत असल्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जर तुम्हाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत घट्टपणा जाणवत असेल तर अशा परिस्थितीतही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल आणि अंथरुणातून उठताना त्रास होत असेल. याशिवाय कंबरेच्या खालच्या भागात असह्य वेदना होता असतील तर ही लक्षणे ओमिक्रॉनमुळे असू शकतात.

जर तुम्हाला रात्री झोपताना घाम येत असेल तर हे देखील ओमिक्रॉनचे लक्षण असू शकते. तुम्हाला असा त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या.

– घसा खवखवणे
– वाहणारे नाक आणि अनुनासिक रक्तसंचय
– डोकेदुखी
– थकवा
– शिंकणे
– शरीरातील वेदना
– पाणीदार डोळे
– त्वचेवर लालसर निळे डाग किंवा पुरळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -