Tuesday, September 26, 2023
Homeजरा हटकेमिसेस मुख्यमंत्री : ही जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल ( फोटो पहा...

मिसेस मुख्यमंत्री : ही जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल ( फोटो पहा )

मिसेस मुख्यमंत्री या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुमी पायलटची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘सुमी’ चा लाडका ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. मिसेस मुख्यमंत्रीची ही जोडी नव्या वर्षात भेटीला येत आहे. अमृता धोंगडे आणि तेजस बर्वे यांची जोडी छोट्या नाही तर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘दिशाभूल’ आहे.

सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मित आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पुण्यात पार पडला.

यावेळी अभिनेता तेजस बर्वे, निर्मात्या आरती चव्हाण, नीलेश आर. विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, संगीतकार प्रथमेश धोंगडे, गीतकार हरिभाऊ धोंगडे, नृत्य दिग्दर्शक नील राठोड, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, वेशभूषाकार शीतल माहेश्वरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते

दिशाभूल’ मध्ये अमृता धोंगडे, तेजस बर्वेसह आणखी एक जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

आम्ही अमृता आणि तेजस यांच्यासह मराठीतील नामवंत कलाकारांना एकत्र घेऊन एक वेगळा प्रयोग करत आहोत, त्याला प्रेक्षक साथ देतील असा विश्वास वाटतो.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र