Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्हा बँक : जवळच्यांनी माझा ठरवून कार्यक्रम केला, पण मी त्यांचं...

कोल्हापूर जिल्हा बँक : जवळच्यांनी माझा ठरवून कार्यक्रम केला, पण मी त्यांचं पांग फेडणार : प्रकाश आवाडे

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने अपेक्षेनुसार बाजी मारली. असे असले तरी आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. या पराभवानंतर आमदार विनय कोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याचबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याबाबत वक्तव्य केल आहे. सत्ताधारी गटातील काहींनी दगाबाजी केल्याने त्यांचा पराभव झाल्याचा आरोप आमदार विनय कोरे यांनी केला.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे प्रकाश आवाडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मला कधी ना कधी यांचा झटका बसणारच आहे. आणि तो बसत आलाय. त्यामुळे मला हे नवीन नाही. आमच्या सर्वात जवळच्या लोकांनी तुम्हाला आज का झटका दिला. मला झटका दिला. हा अनुभव काल-परवा दिवशीचा आहे. जिल्हा बँकेत मला त्यांनी जवळ घेऊन झटका दिला. पण आता मला झटक्याचे एवढं महत्त्व नाही. त्या झटक्याचं कसं पांग फेडायचं हे आमदार प्रकाश आवडेंना माहित आहे. हे ज्या त्या वेळी इचलकरंजीकरांनी अनुभवलं आहे. आता याचा जिल्ह्यालाही अनुभव येईल. असा इशारा आमदार आवाडे यांनी थेट जिल्हा बँकेतील निवडून आलेल्या सत्ताधारी गटाला दिला आहे.

जे काही पाप ज्या लोकांच्या हातून झालं आहे; त्याला योग्यवेळी किंमत मोजावी लागेल. कोल्हापूर जिल्हा सुद्धा ((कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक) ही गोष्ट लक्षात ठेवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

विनय कोरे म्हणाले की, सत्ताधारी पूर्ण ताकदीने पाठीशी राहिले असते तर शिवसेना विरोधी आघाडीला एकही जागा जिंकता आली नसती. पण सत्ताधारी गटातील काही नेत्यांनी दगाबाजी केल्याने प्रकाश आवाडे यांना पराभव स्वीकारावा लागला. आवाडेंच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -