Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनसामंथा आता सलमान खानच्या प्रेमात ?

सामंथा आता सलमान खानच्या प्रेमात ?

हृतिक रोशनला भेटल्यानंतर हाॅलिवुडची अभिनेत्री सामंथा लाॅकवुड काही दिवसांपूर्वीच चर्चेत आली होती. याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले होते. मात्र, हाॅलिवुडची ही अभिनेत्री जेव्हा सलमान खानला भेटली, त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, सामंथाने यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानशी अफेयर सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर सामंथाने उत्तर देताना म्हंटलंय की, “मला वाटलं लोक खूपच बोलतात. लोक विषय नसतानाही खूप विषयांवर चर्चा करतात. मी सलमानला भेटली होती. आणि ती खूप चांगली व्यक्ती आहे. मला इतकंच सांगायचं आहे… मला कळत नाही की, लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात कल्पना कशा सुचतात. मी हृतिक रोशनलादेखील भेटले होते. मात्र, त्यावर लोकांनी चर्चा केली नाही. मला कळत नाही की, या गोष्टी कुठून येतात.”

सामंथाला सलमान खानचा ‘सुलतान’ नावाचा चित्रपट खूपच पसंत आलेला होता. इतकंच नाही तर ती सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्येही सहभागी झालेली होती. ही पार्टी सलमानच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये झालेली होती. सामंथा लाॅकवुड ‘द हिरो’ आणि ‘हवाई फाईव-0’ या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. सामंथा टर्न बॅक नाऊ, साइ फायटर आणि मेक्सिन गोल्ड या चित्रपटांमध्येही प्रेक्षकांनी दिसली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -