Saturday, July 27, 2024
Homeइचलकरंजीतब्बल 26 दिवसानंतर पंचगंगेततून पाणी उपसा सुरू

तब्बल 26 दिवसानंतर पंचगंगेततून पाणी उपसा सुरू


खराब उपसापंपामुळे गेल्या २६ दिवसांपासून बंद असलेला पंचगंगेचा पाणी पुरवठा अखेर सुरू करण्यास नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला यश आले आहे. नव्याने २०० अश्वशक्ती (एचपी) चा उपसा पंप कार्यान्वित करून पंचगंगेतून पाणी उपसा करण्यास मंगळवारपासून सुरूवात केल्याने गेल्या काही दिवसांपासून पाचसहा दिवसांतून येणारे पाणी दोन दिवसाआड येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासापासून दिलसा मिळणार आहे.

इचलकरंजी शहरला मजरेवाडी येथून कृष्णा नळपाणी पुरवठा योजना आणि पंचगंगेतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. पंचगंगा नदीवरील उपसा केंद्रामधील असणारे २५० अश्वशक्ती (एचपी) चे दोन पंप वारंवारच्या कचरा व गाळा मुळे खराब झाले होते. त्यामुळे गेल्या २६ दिवसांपासून
पंचगंगेतून पाणी उपसा पुर्णपणे बंद करण्यात आला होता.

सदरचे दोन उपसा पंप जुने असल्याने सदरचे पंप बदलण्याचे काम पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले होते. पहिल्या टप्प्यात नव्याने २०० अश्वशक्तीचा १ पंप कार्यान्वित करण्याचे काम सुरू होते. त्याचे काम पुर्ण होऊन त्यातून पाणी उपसा मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरवासियांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

तसेच कट्टीमोळा डोहातून पाणी उपसा करण्याचे काम येत्या आठ दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. पाईप लाईनचे काम पुर्ण झाले असून त्याचे टेस्टींग सुरू आहे. डोहामध्ये २०० एचपीचा
उपसा पंप सोडल्यानंतर त्याद्वारे ही पाणी उपसा केला जाणार आहे. त्याचबरोबर कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला शिरढोण येथील पंचगंगा नदीत मोठी गळती लागली आहे. मात्र नदीतील पाणी जादा असल्यामुळे वितरण नलिकेतील गळती काढण्याचे कामात अडथळे येत आहेत. पाण्याची लेवल कमी झाल्यानंतर सदरची गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -