वर्षाच्या सुरूवातीलाच बॉलिवुडमधून बॅड न्यूज आली आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक होते. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अर्जुनने मलायकाशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत.
मलायका अरोरा गेल्या ६ दिवसांपासून घराबाहेर पडलेली नाही. ब्रेकअपच्या शॉकने तिला एकटे राहायचे आहे आणि घराबाहेर पडण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगितले जात आहे. अर्जुन कपूर पूर्वी रिया कपूरच्या घरी डिनरसाठी गेला होता. रियाचे घर मलायकाच्या घराच्या अगदी जवळ असूनही अर्जुन कपूर तिथे गेला नाही. मलायका आधी अर्जुन कपूरसोबत फॅमिली डिनरला जायची, पण आता अर्जुन फॅमिलीसोबत एकटा वेळ घालवत आहे.
जेव्हा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली तेव्हा काही लोकांना त्यांचे नाते विचित्र वाटले पण हळूहळू सर्वांनी त्यांचे नाते स्वीकारले. मलायका अरोरा हिला काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरच्या फॅमिली फंक्शन्समध्ये एन्ट्री मिळाली होती, त्यानंतर असे मानले जात आहे की दोघेही लवकरच लग्न करू शकतात परंतु त्या शक्यता आता मावळल्या आहेत.