बनावट दागिने ठेवून बँकेची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 87 जणांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
सौंदलगा येथे मध्यवर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून युनियन बँकेची शाखा भाडोत्री इमारतीत कार्यरत आहे. यापूर्वी ही बँक कार्पोरेशन बँक म्हणून ओळखली जात होती. अलीकडेच या बँकेचे विलीनीकरण झाले आहे.
सोने ठेवून कर्ज ठेवलेल्या 87 जणांनी बनावट सोने ठेवून बँकेची फसवणूक केल्याचे हलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यानुसार हलकर्णी यांनी ही बाब वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली.
त्यानंतर बँकेच्या वरिष्ठांनी लेखा परीक्षणाला तातडीने सुरुवात केली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये एकूण 87 जणांनी आपल्या मालकीचे सोन्याचे बनावट दागिने ठेवून 3 कोटी रुपयांची उचल केल्याचे दिसून आले.