Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; आंबा घाट दरीत मोटार कोसळून राजारामपुरीतील वृद्धाचा अंत

कोल्हापूर ; आंबा घाट दरीत मोटार कोसळून राजारामपुरीतील वृद्धाचा अंत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट दरीत स्विफ्ट कार सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळून कारचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घडला. संजय गणेश जोशी (वय 63, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृत कारचालकाचे नाव आहे.

जोशी हे कारमधून (एम.एच. 09 डी 1099) कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करीत होते. त्यांची कार आंबा घाट येथील विसावा पॉईंटनजीक आली असता घाटाचा कठडा तोडून सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळली. रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सायंकाळी संजय जोशी यांचा मृतदेह खोल दरीतून काढण्यात आला. मृतदेह विच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आंबा येथे अपघातात ठार झालेले संजय जोशी यांचे कुटुंबीय मूळचे कोकणातील आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ते पत्नी व मुलीसोबत कोल्हापुरात स्थायिक झाले. राजारामपुरी परिसरात त्यांचा पडदे विक्रीचा व्यवसाय होता. सध्या राजारामपुरी पाचव्या गल्‍लीमध्ये पत्नीसोबत ते राहत होते. त्यांची मुलगी नोकरीसाठी पुण्यात असून, तिला अपघाताची माहिती दिल्यानंतर ती कोल्हापूरकडे रवाना झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -