Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकर्नाटक सरकारचा यु टर्न, १७ जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय

कर्नाटक सरकारचा यु टर्न, १७ जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

11 ते 18 जानेवारीपर्यंत पहिली ते नववीच्या शाळा (schools) बंद ठेवण्याचा आदेश बदलून आता सोमवारपासूनच (17 जानेवारी) सुरू करण्याचा नवा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बजावला आहे.

पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात 275 रुग्णांची भर पडली.

बेळगाव जिल्ह्यातील शाळा मंगळवार 18 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार, अशी माहितीदेखील देण्यात आली होती. मात्र बुधवारी काढण्यात आलेल्या सुधारित आदेशात येत्या सोमवारपासून पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा सुरु होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून हा आदेश काढला गेला असण्याची शक्यता आहे.

कित्तूर येथील निवासी शाळेतील 65 विद्यार्थिंनींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी 18 जानेवारीपर्यंत पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शाळा सध्या बंद आहेत. बेळगाव जिल्ह्यात 150 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.यामध्ये बेळगावमधील कॅम्प येथील खासगी शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा सामावेश आहे.
तथापि, सोमवारपासून पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -