Sunday, December 22, 2024
Homeनोकरीखुशखबर! Infosys मध्ये ५५ हजार आयटी फ्रेशर्सची भरती

खुशखबर! Infosys मध्ये ५५ हजार आयटी फ्रेशर्सची भरती


माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने (Infosys) ३१ डिसेंबर २०२१ (तिसऱ्या तिमाहीत) रोजी संपलेल्या तीन महिन्यांत ५,८०९ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा १२ टक्के अधिक आहे. यानंतर इन्फोसिसने आयटी क्षेत्रातील फ्रेशर्संना एक गुड न्यूज दिली आहे. इन्फोसिसने २०२२ या नवीन आर्थिक वर्षात ५५ हजार फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखली आहे.

इन्फोसिसचे (Infosys) मुख्य वित्त अधिकारी निलांजन रॉय यांनी म्हटले आहे की, कंपनीच्या विकासात गुंतवणुकीला प्राधान्य देणे सुरूच आहे. त्याचबरोबर आता नवीन आर्थिक वर्षात ५५ हजारहून अधिक फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे.

एका रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ९२ हजार ६७ एवढी होती. तर याआधीच्या तिमाहीत २ लाख ७९ हजार ६१७ होती. डिसेंबर २०२० पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ३१२ एवढी होती.

कंपनीचे सीईओ आणि एमडी सलिल पारेख यांनी अधिक माहिती देताना म्हटले आहे की, कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर भर दिला जाणार आहे. त्या अंतर्गत, आम्ही आमच्या ग्राहकांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमतेवर अधिक लक्ष केंद्रीत आहोत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे कल्याण हे आमचे प्राध्यान्य आहे.

डिसेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीत इन्फोसिसचा महसूल २२.९ टक्क्यांनी वाढून ३१,८६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी कंपनीचा महसूल २२,९२७ कोटी रुपये होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -