Friday, June 21, 2024
Homenewsएकाच घरात तिघींना सर्पदंश!, दोन चिमुकल्यांचा मृत्यू

एकाच घरात तिघींना सर्पदंश!, दोन चिमुकल्यांचा मृत्यूकेज तालुक्यातील सोनेसांगवी नं. २ येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील दोन मुली व आईला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याने दोन्ही मुली दगावल्या असून आईवर उपचार सुरू आहेत.

या बाबतची माहिती अशी की, ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या दरम्यान सोनेसांगवी नं. २ (ता. केज) येथील दीपक साखरे यांच्या कुटुंबातील सौ. जयश्री दीपक साखरे (वय ३० वर्ष), कु. स्वप्नाली दीपक साखरे (वय ४ वर्ष), कु. स्वीटी दीपक साखरे वय (३ वर्ष) या तिघी मायलेकींना त्यांच्या घरात झोपलेल्या असताना विषारी साप चावला. त्यात स्वप्नाली साखरे व स्वीटी साखरे या दोन्ही चिमुकल्या जागीच गतप्राण झाल्या.

तर त्यांची आई सौ. जयश्री साखरे यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामाननंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -