Wednesday, November 13, 2024
Homeमहाराष्ट्रआजीचा कालव्यात मृतदेह; नातू बेपत्ता

आजीचा कालव्यात मृतदेह; नातू बेपत्ता

ताजी बातमी ऑनलाइन टीम

पिंपरे बुद्रुक (ता. खंडाळा) येथील एक 7 वर्षांचा मुलगा आपल्या 65 वर्षांच्या आजीसोबत दोन दिवसांपासून घरातून निघून गेला आहे, तो अद्याप सापडलेला नाही. बेपत्ता झालेल्या मुलाच्या आजीचा मृतदेह नीरा उजव्या कालव्यात आढळून आला आहे, तर त्याची आजारी आईही राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरे बुद्रुक (ता. खंडाळा) येथे कांताबाई बापू कराडे (वय 65) या आपली मुलगी पद्मा बापुराव कराडे (वय 32) व तिचा मुलगा सत्यजित ऊर्फ बंटी दादासो गलांडे (वय 7) हे एकत्र राहत होते. त्यांची मुलगी पद्मा गेल्या दोन वर्षांपासून आजारी होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आजी कांताबाई व नातू सत्यजित हे गावातून बेपत्ता झाले होते.

दि. 14 रोजी दुपारी 4 च्या सुमारास कांताबाई यांचा रावडी बुद्रुक (ता. फलटण) गावाच्या हद्दीत नीरा उजव्या कालव्यात मृतदेह आढळून आला. नातू सत्यजित ऊर्फ बंटी अद्यापही बेपत्ता आहे. लोणंद पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -