Friday, September 20, 2024
Homeआरोग्यविषयकतिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोविड-19ची लक्षणं का दिसतात, जाणून घ्या कारण!

तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोविड-19ची लक्षणं का दिसतात, जाणून घ्या कारण!


कोरोना (Corona Virus) महामारीने जगातील सर्वच देशांच्या चिंतेत वाढ केली आहे. कोरोनाने (Covid-19) जगातील अनेक देशांमध्ये आपले हातपाय पसरले आहे. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाच्या चिंतेत वाढ करणाऱ्या कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे म्हटले जात आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत आहे. एकीकडे लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असताना दुसरीकडे कोरोनाचा परिणाम लहान मुलांवरही दिसू लागला आहे. 14 जानेवारी 2022 पर्यंत भारतात एकूण 2,64,202 नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता लहान मुलांना देखील लस (Corona Vaccine) देण्यास सुरुवात झाली आहे.


संशोधनातून असे दिसून आले आहे की, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि त्यांना कोरोना होऊ शकत नाही, परंतु मुलांची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत असू शकते असा समज लोकांनी केला आहे. दुसरे कारण म्हणजे लहान मुलांना वेगळे ठेवता येत नाही. कारण या वयात त्यांना एकटे सोडणे कठीण आहे. यामुळे त्यांच्या पालकांकडून किंवा काळजीवाहू व्यक्तींकडून संसर्ग प्रसारित होण्याची शक्यता वाढते..


कोरोनाची लक्षणं (coronavirus symptoms) म्हणजे सर्दी. जी सामान्यतः लहान मुलांमध्ये दिसून येते. हवामानातील बदल किंवा खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लहान मुलांमध्ये सर्दी आणि तापाची लक्षणं ही नेहमी दिसतात. ज्यामुळे कोरोनाची चाचणी (Corona Test) कधी करावी हे समजणे कठीण होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आणि नमुने समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -