देशालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट २५ वर्षांपूर्वी बालकांच्या अपहरणानंतर त्यांची हत्या करणार्या मायलेकीना ठोठावलेली फाशी उच्च न्यायालयाने रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सीमा आणि रेणूकाच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर राष्ट्रपतींनी ही त्यांचा दयेचा अर्ज सात वर्षांपूर्वी फेटाळल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच गेली २५ वर्षे कारावास भोगत आहेत असे स्पष्ट करत न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल याचे खंडपीठाने या दोघींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली .
कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित तिच्या दोन मुली सीमा आणि रेणूकाच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर राष्ट्रपतींनी ही त्यांचा दयेचा अर्ज सात वर्षापूर्वी फेटाळला. फाशीची शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर फासावर चढवण्यास सरकारला अपयश आले. याचा फायदा घेत या भगिनीनी उच्च न्यायालयात फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती.