ताजी बातमी ऑनलाइन टीम
जिल्ह्यातील रुग्णांचा आधारवड अशी सीपीआरची ओळख आहे. कोरोना महामारीत येथील वैद्यकीय पथके करत असलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांचे हे काम सुरळीत सुरू असताना राज्याचा वैद्यकीय विभाग येथील डॉक्टरांना सिंधुदुर्ग येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील प्रतिनियुक्तीचा आदेश काढला आहे.
आतापर्यंत चार वेळा हा आदेश काढण्यात आला आहे. कोरोनाच्या महामारीत येथील वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी आता पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर या तिन्ही मंत्र्यांनी मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयास बूस्टर ‘डोस’ देणे गरजेचे आहे.
कोरोना महामारीत सीपीआर ला वैद्यकीय साधनांची कमतरता भासत होती. त्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न करून कोट्यवधी रुपयांची वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध केली. त्यामुळेच कोरोना महामारीत शेकडो रुग्णांचे प्राण वाचले. गेल्या पावणेदोन वर्षापासून कोरोना संसर्गाविरुद्ध लढा सुरू आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर सीपीआर मध्ये नॉन कोरोना रुग्ण सेवेला सुरुवात झाली.
कोल्हापूर: रुग्णांचा आधारवड सीपीआरला हवा बूस्टर डोस!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -