Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीकारखानदारांनी घोषित मजूरीवाढ देऊ नये ( इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचे आवाहन )

कारखानदारांनी घोषित मजूरीवाढ देऊ नये ( इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचे आवाहन )

ताजी बातमी ऑनलाइन टीम

यंत्रमाग कामारांच्या मजूरीमध्ये ५२ पिकास प्रती मीटर ७ पैशांची वाढ सहाय्यक कामगार आयुक्त यांनी घोषित केली आहे. मजूरी वाढीस यापूर्वीच यंत्रमागधारकांनी विरोध केला असतानाही एकतर्फी वाढ घोषित केली असल्यामुळे घोषित मजुरी कारखानदारांनी देऊ नये, असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.
सन २०१३ मध्ये यंत्रमागधारक संघटना व कामगार संघटना यांच्यात दरवर्षी महागाई भत्यास अनुसरून मजूरीवाढ करण्याचा संयुक्त करार झाला होता. परंतू यंत्रमाग उद्योगातील अभूतपूर्व मंदी, राज्य व केंद्र सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष, आयातनिर्यातीचे धोरण, सुतदर संदर्भातील धोरण, सुट्या भागांची दरवाढ, वीजेच्या दरात झालेली भरमसाठ वाढ या कारणांमुळे अडचणीत आलेल्या यंत्रमाग उद्योगास दरवर्षी मजूरीवाढ देणे अशक्य बनले आहे. ट्रेडिंग असोसिएशनने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मागील ८ वर्षात कोणतीही मजूरीमध्ये वाढ न केल्यामुळे मागील ४ वर्षापासून
यंत्रमाधारक संघटना या करारातून बाहेर पडलेल्या आहेत.

तसा ठराव यंत्रमागधारकांच्या मेळाव्यामध्ये होऊन या ठरावाची प्रत सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेली आहे. यावेळीसुद्धा कामगार संघटनांनी मजूरीवाढ मागितल्यानंतर पॉवरलूम असोसिएशनने अतिरिक्त कामगार आयुक्त पुणे व सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांना प्रत्यक्ष भेटून उद्योगाविषयी सविस्तर माहिती देत मजूरीवाढीची घोषणा करू नये, अशा आशयाचे निवेदन दिले होते. असे असताना एकतर्फी मजूरीवाढ घोषित केली आहे.अडचणीतील यंत्रमाग उद्योग विविध कारणाने अधिक अडचणीत येऊन यंत्रमाग बंद पडून यंत्रमागाची संख्याही कमी झाली आहे. केवळ इचलकरंजी केंद्रात दरवर्षी मजूरीवाढ घोषीत केल्यामुळे येथील उत्पादन खर्च इतर केंद्रापेक्षा प्रचंड वाढल्यामुळे येथील कापडास बाहेरील बाजारपेठेतून मागणी येणे कमी झाले आहे. त्यामुळे येथील उद्योग चालू ठेवणे मुश्कील झालेले आहे. अशा परिस्थितीत मजूरीवाढ देणे अशक्य आहे आणि ते देऊ शकणार नाहीत, असे पत्रक दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -