ताजी बातमी ऑनलाइन टीम
इचलकरंजी शहरात दिवसेदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनावर पुन्हा ताण पडू लागला आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी नागरिकांकडून याबाबत म्हणावी तितकी काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. सध्या १२७ अॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरूवारी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३० नव्या रूग्णांची भर पडली आहे.
प्राप्त झालेल्या अहवालानुसार आयजीएम परिसर ३, कागवाडे मळा, विवेकानंद कॉलनी, जवाहर नगर, गणेश नगर, भाटले मळा, शहापूर भागात प्रत्येकी २ रूग्ण आढळून आले. शिरगुरे गल्ली, टाकवडे वेस, सुतार मळा, दाते मळा, सिध्दार्थ नगर, बोहरा मार्केट, अमराई रोड, नेहरू नगर, शिवाजीनगर, कोल्हापूर नाका, बीजेपी मार्केट परिसर, पुरोहित प्लाझा, साईनगर, हत्ती चौक आदि भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला.
शहरात आजअखेर रूग्णांची संख्या ९ हजार ८९० वर जाऊन पोहोचली आहे. तर कोरोनावर मात करून घरी गेलेल्यांची संख्या ९ हजार ३५९ इतकी आहे. कोरोनामुळे आजअखेर ४०४ जणांचा मृत्यू झाला आहे.
इचलकरंजीत रुग्ण संख्येत वाढ ( गुरुवारी 30 रुग्णांची भर ; 127 अॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -