पंचगंगा नदीतील मासे मरून तरंगू लागले आहेत. गुरुवारी सकाळपासून मृत माशांचे प्रमाण वाढले. त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने घेतले. त्याच्या विश्लेषणानंतरच माशांच्या मृत्यूचे कारण समजेल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डॉ. अर्जुन जाधव यांनी सांगितले.
बुधवारी पंचगंगा नदीत पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक मासे पाण्यावर तरंगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कसबा बावडा येथील महादेव पिसाळ याने हा व्हिडिओ समोर आणला. माळी मळ्यापासून पुढे पंचगंगा नदीमध्ये अनेक मासे तरंगत असल्याचे दिसत आहे.