Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरदहा लाखाची लाच घेताना दोन पोलिस जाळ्यात

दहा लाखाची लाच घेताना दोन पोलिस जाळ्यात

ताजी बातमी ऑनलाइन टीम

चोरीच्या गाड्यांची विक्री केल्याचा गुन्हा दाखल करून, मोका लावण्याची भीती घालून, कारवाई टाळण्यासाठी २५ लाखाची लाच मागणी करून, १० लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेतील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.

शुक्रवारी (ता.२१) पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिस हवालदार विजय केरबा कारंडे (वय ५० रा. चौगुले पार्क,उचगाव), पोलिस नाईक किरण धोंडीराम गावडे (वय ३७ रा.मोरेवाडी,ता.करवीर) अशी अटक केलेल्या पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यावर शाहपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

आठ दिवसात पोलिस दलातील तिघांवर लाच घेतल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलातील खाबुगिरी जोर धरत असल्याचे पुढे येत आहे. यातील फिर्यादी दत्तात्रय जाधव यांच्या मुलगा संदेश याचा दुचाकी गाड्या खरेदीविक चा व्यवसाय आहे. तो मुंबई, वेगवेगळ्या किरण गावडे जिल्ह्यातून जुन्या दुचाकी खरेदी करून कोल्हापूर जिल्ह्यात विक्री करतो.

चार दिवसांपूर्वी जाधव यांनी पनवेल, मुंबई येथून अडीच लाखांची स्पोर्टस् बाईक आणली होती. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार विजय कारंडे व पोलिस नाईक किरण गावडे यांना ही माहिती मिळाली होती. त्याला चोरीच्या गाड्या विक्रीच्या संशयावरून १८ व १९ जानेवारी रोजी गुन्हे शाखेत बोलवून घेऊन दिवसभर त्यांना
बसवून ठेवले. विजय कारंडे तइया वर चोरीचा गुन्हा दाखल करणार तसेच मोकांतर्गत कारवाई करतो. तू बनावट स्मार्ट कार्ड तयार करतोस, असे आम्हाला समजले आहे. कारवाई टाळण्यासाठी वनटाईम २५ लाख रुपये दिलेस, तर गुन्हा दाखल करत नाही सोडून देतो असे म्हणाले संदेश ने ने दहा लाख देतो असं म्हणत होता

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -