Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगसावत्र बापानं 16 वर्षीय मुलीला शीतपेयातून दारू पाजून केलं 'काम' तमाम, पीडितेनं...

सावत्र बापानं 16 वर्षीय मुलीला शीतपेयातून दारू पाजून केलं ‘काम’ तमाम, पीडितेनं आपबिती सांगितल्यानंतर…

ताजी बातमी ऑनलाइन टीम

सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पीडिता गरोदर राहिल्याने घरात कोणालाही न सांगता ती निघून गेली. मात्र पोलीस तपासात ज्यावेळी सत्य समोर आले त्यावेळी सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद देणाऱ्या पित्यालाच अटक केली

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकोट पोलीस ठाण्यात (akot police station) एका सावत्र पित्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद १८ जानेवारीला दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी भादंवि कलम ३६३ (IPS 363) नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस पथकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र २० जानेवारीला बेपत्ता मुलगी आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. मुलीला पाहून पोलिसांचा जीव भांड्यात पडला पण मुलगी व आईने घडलेल्या घटनेची आपबिती पोलिसांना सांगितली. त्यावेळी सर्वांची मने सुन्न झाली.

अपहरणाची तक्रार देणाऱ्या सावत्र पित्याने मुलीला सात महिन्यांपूर्वी अमरावतीवरून अकोटला घरी आणले. त्यानंतर मुलीला थंडपेयामधून दारू पाजून लैंगिक अत्याचार केला. सतत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर राहली. दरम्यान पीडितेने अकोट येथून पलायन करून आईकडे जात, सर्व हकिकत सांगितली. त्यामुळे आई व मुलीने अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -