Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगछत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा क्रांतीचौकात विराजमान

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा क्रांतीचौकात विराजमान

छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन अश्वारुढ पुतळा आज पहाटे क्रांतीचौकात विराजमान झाला. ३१ फूट उंच चौथऱ्यावर हा २१ फूट उंच पुतळा बसविण्यात आला आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा आहे. लवकरच या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी क्रांती चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला. महापालिकेने आधीचा पुतळा काढून तिथे शिवरायांचा नवीन उंच पुतळा बसविण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला हाेता. त्याचवेळी चौथऱ्याच्या कामासाठी जुना पुतळा काढून घेण्यात आला हाेता. आता क्रांती चौकात ३१ फूट उंच नवीन चौथरा बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासोबतच काही दिवसांपासून पुणे येथे चित्रकल्पक आर्ट येथे शिवरायांचा २१ फूट उंच पुतळा बनविण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यावर रविवारी मध्यरात्री हा पुतळा मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवून क्रांती चौकात दाखल झाला. हा पुतळा विराजमान करण्याची कार्यवाही सोमवारी रात्र सुरू झाली. मंगळवारी पहाटे हा पुतळा चौथऱ्यावर विराजमान झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -