‘इलेक्शन सबकुछ करवाता है, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’, असे म्हणतात. पण, सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी शहाजोगपणा ठेवावा लागतो, हेही तितकेच खरे. आता हेच बघा ना, म सलग पाच आठवड्यांपासून या दरात वाढ होत असून, ऑक्टोबर 2014 नंतर प्रथमच अशा प्रकारे कच्च्या तेलाचे भाव विक्रमी भडकले आहेत. मात्र, अशातही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याने, पाच राज्यांतील निवडणुकांनी भाववाढ रोखल्याचा प्रत्यय सध्या भारतीय जनतेला येत आहे.
भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती निश्चित करण्याचे सर्वाधिकार पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांना दिले आहेत. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढूनदेखील तेल कंपन्या देशांतर्गत दरात कसलीच वाढ करताना दिसत नाहीत. त्याचे एकमेव कारण म्हणजे पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होय. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
आठ वर्षांपूर्वी असलेले सर्वाधिक दर सध्या प्रतिबॅरल मोजावे लागत आहेत. मात्र, अशातही गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमतींनी 2014 नंतर प्रथमच प्रतिबॅरल 87 डॉलर्स ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. जागतिक पातळीवरील वाढता भू-राजकीय तणाव आणि पुरवठ्यातील अडथळे यामुळे कच्च्या तेलात दरवाढ होत आहे.